प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसेक्स Toys वापरावेत का? त्याने आरोग्यावर काही परीनाम होईल का?

1 उत्तर

लग्न न झालेल्या प्रौढ व्यक्तीला,  विधवा व्यक्तीला,  अपंग व्यक्तींना किंवा इतर  व्यक्ती ज्यांना  लैंगिक जोडीदार मिळणं कठीण असतं. अशा वेळी जोडीदाराशिवाय लैंगिक आनंद मिळवण्यासाठी  काहीजण लैंगिक उपकरणे किंवा खेळणी वापरतात. दुसऱ्या कोणाला धोका न पोहचवता किंवा त्रास न देता लैंगिक खेळणी (sex toys) वापरून     लैंगिक आनंद अनुभवण्यास काहीच हरकत नाही. जर योग्य ती स्वच्छता राखून आणि लैंगिक अवयवांना इजा होणार नाही यांची काळजी घेऊन लैंगिक खेळणी (sex toys) वापरली तर काहीही धोका नाही.  जर एकापेक्षा अनेक व्यक्तींनी  एकच  लैंगिक खेळणी किंवा साधने वापरली तर मात्र लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होण्याची शक्यता असते.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 7 =