स्तनांचा आकार लहान असण्याची अनेक प्रकरची कारणं असू शकतात. जसं अनुवांशिक जनुकीय गुणसुत्रं, शरीरामध्ये तयार होणार्या हार्मोन्सचं प्रमाण किंवा इतर काही वैद्यकीय कारणंदेखील असू शकतात. शरीरात तयार होणार्या चरबीचं प्रमाणदेखील स्तनांच्या आकारासाठी कारणीभूत असतं. त्यामुळं प्रत्येक स्त्रिच्या स्तनांचा आकार हा वेगळा असू शकतो.
लैंगिक सुख मिळवण्यासाठी स्तनांचा आकार मोठा असण्याची गरज नसते. स्तनांचा आकार किती असावा याचं कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. आणि ते होवू शकत नाही. त्यामुळं स्तनांचा आकार मोठा असावा की छोटा याबद्दल चिंता करण्याच कारण नाही.