प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्रियांच सेक्स च्या जागी किती होल असतात
1 उत्तर

स्त्रियांच्या योनीच्या भागामध्ये दोन ओपनिंग(मुख) असतात. याला बोलीभाषेत जरी होल म्हणतात पण तो शब्द तितकासा योग्य नाही. पुरुषांची लघवी करण्य़ाची जागा आणि वीर्य बाहेर येण्याची जागा एकच असते. तसं स्त्रियांचं नसतं. लघवीसाठी मुत्रमुख (युरेथ्रल ओपनिंग) योनीच्या सर्वात वरच्या भागात असतं. त्याखालोखाल योनीमुख(व्हजानल ओपनिंग) असतं. योनी मुखाचा वापर गर्भाशयातील मूल बाहेर येण्य़ासाठी आणि संभोगासाठी होतो. मासिक पाळीच्या काळामध्ये होणारा रक्तस्त्राव योनीमुखातून बाहेर येतो. योनीमुखाच्या खाली गुदद्वार असतं. गुदद्वार म्हणजे ’शी’ची जागा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 14 =