प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्री विषयी: स्त्रीच्या स्तनातून दूध का येतं? आणि केव्हा येतं ?
1 उत्तर

दूध का येतं याचं उत्तर अगदी सरळ आहे. जन्माला आलेल्या बालकाच्या पोषणासाठी ज्या पदार्थांची गरज असते ती दूधापासून भागवली जाते. सुरुवातीच्या काळात नवजात बाळामध्ये बाहेरील अन्नपदार्थ पचवण्याची क्षमता फारच कमी असते. अशावेळी बाहेरील अन्नपदार्थ खाणं सुरु होईपर्यंत शरीराला लागण्य़ार्‍या अन्नाची गरज दूधातून भागवली जाते. पहिल्या बाळंतपणामध्ये प्रसुतीच्यावेळी स्तनांमधून दुध येण्यास सुरुवात होते. प्रसुतीपासून साधरण पुढील २ वर्षं दूधनिर्मिती चालू राहू शकते.

स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्तन असतात. परंतू दूध निर्माण करण्यार्‍या ग्रंथी वाढ केवळ स्त्रीयांच्या स्तनांमध्ये होते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 2 =