प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › स्वप्न दोष म्हनजे काय ? शारिरावरिल परिनाम काय ?

स्वप्न दोष म्हनजे काय ? शरिरावरील परिनाम काय ?

1 उत्तर

स्वप्नदोष हा शब्दच मुळात वापरणं थांबवलं पाहिजे. किशोरवयामध्ये किंवा मुलं वयात येत असतानाच्या काळात कधी कधी झोपेत असताना लिंग ताठर होतं आणि वीर्य बाहेर येतं. जननेंद्रियांचं काम नीट चालू असल्याचं ते लक्षण आहे. मात्र अशा सामान्य घटनेला स्वप्नदोष असं नाव दिल्यामुळे त्यात काही तरी गैर आहे अशी भावना तयार होते. झोपेत वीर्य बाहेर येणे असा याचा साधा सरळ अर्थ आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 2 =