प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन करतांना एखाद्या स्त्रीबद्दल तिच्याशी काल्पनिक संभोग करत असल्याची कल्पना करणे हे योग्य आहे का? ही मनोविकृती तर नाही ना? यात अपराधीपणाची भावना वाटते. कृपया मार्गदर्शन करावे.
1 उत्तर

हस्तमैथुन करताना प्रत्येक जण वेगवेगळे विचार मनात आणत असतो. कुणी आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या मुलीचा, मुलाचा किंवा अगदी काल्पनिक स्त्रीचा, पुरुषाचा विचार करून हस्तमैथुन करतं तर कुणी केवळ त्यातून मिळणाऱ्या लैंगिक शारीरिक सुखाकडे लक्ष देतं. यात मनोविकृती नक्कीच नाही. तुम्ही जे करताय त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय आणि बाकी कुणालाही इजा पोचत नाही मग यात अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाही.
एका गोष्टीचा मात्र नक्की विचार करून पहा. एरवी मुलींशी बोलताना, मुलींचा विचार करताना, मुली समोर असल्या तर तुमच्या मनात फक्त सेक्सचा किंवा हस्तमैथुन करण्याचा विचार येत नाही ना याचा विचार करा.
दिल पें मत ले यार…

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 19 =