हस्तमैथुन करण्याची सवय टाळायची आहे आणि त्यासाठी तुम्ही उपाय सुचवा असं सांगितलं आहे. उपाय नक्की करता येतील आणि तुमची ही सवय सुटेहली. पण त्या आधी जरा पुढच्या प्रश्नांची उत्तरं शोधा.
– हस्तमैथुन वाईट आहे असं तुम्हाला कुणी सांगितलंय का?
– हस्तमैथुन केल्याने कमजोरी येते, लैंगिक संबंध ठेवता येत नाहीत, लिंग वाकडं होतं असं काही तुमच्या कानावर आलंय का? किंवा असं कुणी तुम्हाला सांगितलंय का?
– हस्तमैथुन केल्याने वीर्य वाया जातं आणि वीर्य वाया जाणं चांगलं नाही असं तर तुम्हाला वाटतंय का?
वरच्या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील आणि त्यामुळे तुम्ही घाबरला असाल तर मनातून भीती काढून टाका. हस्तमैथुन ही निरोगी, शरीराला आणि मनाला आनंद देणारी आणि हा आनंद मिळवताना दुसऱ्या कुणालाही इजा न पोचवणारी कृती आहे. त्यामुळे अपराधी भावनेतून ही सवय सोडत असाल तर तशी काही गरज नाही.
मात्र तुमचं इतर कोणत्या कामात लक्ष लागत नसेल, बाकी गोष्टी जसं अभ्यास, काम, मित्र-मैत्रिणींशी भेटी गाठी, आवडते छंद इत्यादी मागे पडत असतील तर मात्र ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमच्या मनात लैंगिक भावना निर्माण होतील तेव्हा वेगळं काही तरी करण्याचा, लोकांमध्ये मिसळण्याचा किंवा मन दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करा. दिवसातून 2-3 वेळा वरून दिवसातून एकदा हस्तमैथुन करा.
तुमच्या मनाला आनंद देणाऱ्या इतरही अनेक गोष्टी असतील त्यातली एखादी सुरू करा. आपल्या सवयी लावणं किंवा सोडवणं आपल्याच हातात आहे. अपराधी वाटून घेऊ नका. तुम्ही काहीही वाईट किंवा गैर करत नाही आहात.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा