हस्तमैथुन

1,426
Naresh asked 6 months ago

माझे वय 26 वर्षे आहे. अजून मी सिंगल आहे.

मागील 6 महिने झाले मी दर दोन दिवसांनी हस्तमैथुन करतोय.

माझ्याकडून control होत नाहीये.

जर हस्तमैथुन केले नाहीतर कुठेच लक्ष लागत नाही, डोक्यात sexual विचार येतात आणि मग ब्लूएफिल्म पाहून लिंग हलवतो मी. मग तेव्हा मनाला शांती भेटते आणि फ्रेश वाटते.

आणि मग परत 24 तासानंतर परत लिंग ताठ होतो आणि मग परत हात लिंगाकडे जातो… नि हस्तमैथुन करतो…

हफ्त्यातून 3-4 वेळा तरी मी हस्तमैथुन करतो.

कंट्रोल होताच नाहीये मला कितीही प्रयत्न केले तरी डोक्यातुन जातं नाही.

माझ्यासोबत असे का होत आहे?

हे सगळे नॉर्मल आहे का?

यामुळे लग्नानंतर काहि दुषपरिणाम होतील का?

1 Answers
let's talk sexuality answered 6 months ago

हे फार नॉर्मल आहे. जास्त ताण घेऊ नका.
सारखे लैंगिक विचार मनात येत असतील. तर अशी इच्छा होणं साहाजिक आहे. जर हे कमी करायचं असल्यास इतर गोष्टीत मन रमवा, एकटे जास्त राहू नका, लैंगिक भावना ज्यामुळे सारखी चाळवते त्या गोष्टी पाहाणं टाळा.
अन महत्वाचे….. लग्नानंतर काही दुष्परिणाम नाही होणार. लग्न झालेले पुरुष ही हस्तमैथुन करतातच की.
अधिक माहितीसाठी पुढिल काही लिंक पहा, ऐका, वाचा.
https://letstalksexuality.com/myths-and-facts-about-masturbation/
https://letstalksexuality.com/sex-aani-barach-kahi-episode-12-apale-sukh-apalya-hatat/
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/