प्रश्नोत्तरेहाताने हालवल्यावर आपल्या इंद्रियावर, शरीराच्या नसांवर किंवा सेक्स वर काही फरक पडतो का?

1 उत्तर

हस्तमैथुनाला बोली भाषेत काही जण ‘हाताने हलवणे’ असे म्हणतात. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. मुलींनी किंवा मुलांनी कोणीही हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. लिंगावर किंवा शरीराच्या नसांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनाबद्दलचे अनेकदा चर्चिले आहेत ते जरूर वाचा.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 7 =