तुम्ही लैंगिक समागम किंवा लैंगिक क्रियांबद्दल बोलत असाल तर त्याचे उत्तर नाही असे आहे. स्त्री-पुरुष लैंगिक क्रियांचा आनंद वयाच्या साठ-सत्तराव्या वर्षापर्यंत घेऊ शकतात. हा अनुभव प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असू शकतो.
हे खरे आहे की स्त्री पुरुषांमध्ये जसजसे वय वाढत जाते तसतशी लैंगिक क्रियांमधील इच्छा कमी होत जाते. पुरुषांमध्ये लैंगिक इच्छेसाठी कारणीभूत असलेल्या हार्मोनचे (testestron) प्रमाण कमी होत जाते परंतु ते तयार होणं कधीच थांबत नाही. काही पुरुषांमध्ये हार्मोनचे प्रमाण कमी झाले तरी ते ७० व्या वर्षीही काही प्रमाणात ‘कार्यरत’ दिसतात. मात्र ताणताणाव, कामाचा व्याप, औषधांचा परिणाम किंवा कंटाळा ही कारणं सेक्स मधील इच्छा कमी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
हे स्त्रियांसाठीही लागू आहे. वाढत्या वयानुसार हार्मोन्सचा प्रभाव जसजसा कमी होत जातो तसतशी लैंगिक क्रियांमधील इच्छा कमी होत जाणे हे साहजिक आहे. परंतु नाते संबंधातील तानतणाव, कामाचा बोजा, मानसिक त्रास, हिंसा आणि छळ इत्यादी कारणं ही प्रक्रिया वेगाने करण्यास कारणीभूत ठरू शकतात.
निरोगी जीवनशैली, व्यायाम, आहारावर नियंत्र आणि तणावरहित नातेसंबंध असतील तर उतरत्या वयातही लैंगिक जीवन सक्रीय आणि तितकेच आनंददायी असू शकते.
Please login or Register to submit your answer