प्रश्नोत्तरेCategory: Private Questionअँलोपँथी औषधाने लिंगताठरता व संभोगाचा कालावधी वाढवता येतो का,?

1 उत्तर

इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स stamina वाढवण्याबद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल किंवा न्यूनगंड असेल तर तो काढून टाका. मुळात जास्त वेळ संभोग केला म्हणजे जास्त आनंद मिळतो हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज आहे. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. बाजारात सेक्स stamina किंवा पॉवर वाढवण्याच्या नावावर विकली जाणारी अनेक औषधं उपलब्ध आहेत. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणं धोकादायक ठरू शकतं. व्यायाम, योग्य आहार आणि मन आनंदी राहील अशा कृतींमुळे तुम्ही निरोगी राहू शकता. आणि तुमची तब्येत चांगली असेल तर सेक्समध्येही तुम्हाला जास्त आनंद मिळू शकेल. शरीरातलं रक्ताभिसरण सुरळित असेल तर लिंगाचा ताठरपणा आणि इतर क्रिया सुलभपणे होतात. सेक्स स्टॅमिना वाढवण्यासाठीची औषधं आजारावर उपाय म्हणून वापरली जातात. ज्यांना लिंगामध्ये ताठरपणा येत नाही त्यांच्यासाठी अशा औषधांचा उपयोग होतो. तशी काही समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घ्या. लिगांचा ताठरपणा किंवा शीघ्रपतन याबाबत काही समस्या नसेल तर औषधं घेण्याची गरज नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 4 =