प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsअधिक हस्तमैथुन केले असता शिश्न कठोरता कमी होते का n माझ्या शिश्नचा सुपाड़ा अजिबात बाहेर येत नाही कृपया उपाय सुचवावे

अधिक हस्तमैथुन केले असता शिश्न कठोरता कमी होते का n माझ्या शिश्नचा सुपाड़ा अजिबात बाहेर येत नाही कृपया उपाय सुचवावे

1 उत्तर

नाही. ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. अधिक म्हणजे किती हे सांगणं मात्र आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक निरोगी नसतो हे लक्षात घेऊ यात. आता लिंगाच्या कठोरते विषयी. लिंगाची कठोरता ही रक्ताच्या पुरेशा दाबामुळे निर्माण होते. रक्ताचा पुरेसा दाब निर्माण होत नसेल तर त्याची कारणं शोधणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://letstalksexuality.com/question/लिगांचा-ताठरपणा-कसा-वाढव/
आता तुमचा दुसरा प्रश्न. लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो.
आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.
(फायमॉसिसची माहिती मानवी लैंगिकता या बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून साभार)        

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 17 =