माझे एका विवाहित महिलेशी शरीर संबंध आहेत आम्ही दरवेळी कंडोम लावुनच सेक्स करतो पण एकदा वीना कंडोम ने सेक्स केला होता आणि त्याच दिवशी तिच्या पतीने पन वीना कंडोम सेक्स केला तर काही प्रॉब्लम होऊ शकतो का? आणि अश्या संबंधा मध्ये कीती दिवसाच्या अंतराने वीना कंडोम सेक्स करू शकतो?
कुणी, कोणासोबत आणि किती अंतराने सेक्स करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सेक्स किंवा संभोग किती अंतराने करावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. मात्र समोरच्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक तयारी, आदर, संमती, इच्छा याही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर कोणी खोटी आश्वासने, लग्नाचे आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजेच योग्य ते गर्भ निरोधक वापरून संबंध ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांमध्ये नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे. विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांवर विचार करावा असे वाटते.
- अशा संबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक होण्याची शक्यता असते ज्यामुळे लग्नामध्ये (पती पत्नीमध्ये) वाद विवाद होण्याची शक्यता असते.
- ब्लॅकमेलिंग ची शक्यता असते.
- दुसऱ्याच्या पत्नीसोबत सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
- जर कोणी खोटी आश्वासने, आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो.
- संबंधांमध्ये नको असणारी गर्भधारणा टाळणं, लैंगिक आजारांपासून संरक्षण आणि एचआयव्ही/ एड्सपासून बचाव करणं यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे.