प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsउन्हाळे लागल्यावर उपाय

1 उत्तर

उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य करणे म्हणजे एक तर लघवी तीव्र अथवा कडक असणे किंवा मुत्रनलिकेतील आवरणाचा दाह होत असल्याने साध्या लघवीमुळेही जळजळ होणे. सर्वसाधारणपणे १०-१२ वर्षांवरच्या सर्व व्यक्तींना दिवसभरातून निदान एक लिटर तरी लघवी होते, कारण शरीरात तयार होणाऱ्या टाकाऊ पदार्थांना (युरिया इ.) लघवीवाटे टाकून देण्यासाठी निदान एक लिटर इतके तरी पाणी लागते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण या मानाने कमी झाल्यास लघवी सौम्य न होता कडक किंवा जळजळीत (गडद पिवळी किंवा कधी लालसर) होते व त्यामुळे आवरणाचा दाह होतो. जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो.

उन्हाळीचे दुसरे आणि वारंवार आढळणारे कारण म्हणजे जंतुदोषामुळे किंवा मुतखड्यामुळे मुत्र नलिकेचा दाह होऊन लघवी करताना जळजळणे. यामुळे लघवी वारंवार होणे, गढूळपणा हाही त्रास दिसून येतो. यासाठी जंतुदोषावर वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे.

एक घरगुती उपचार – १

. १०० मि लि पाण्यात २५ ग्राम धने भिजत ठेवून हे पाणी १२-१२ तासांनी गाळून प्यायला द्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 4 =