एच. आय. व्ही. झालेल्या व्यक्तीबरोबर असुरक्षित संभोग केल्याने जोडीदाराला एच. आय. व्ही. होऊ शकतो. गुदमैथुन आणि योनीमैथुनामध्ये हा धोका अधिक असतो. आपण विचारल्यानुसार एच. आय. व्ही. ची लागण झालेल्या मूलीच्या मूखात लिंग दिल्याने म्हणजेच मुखमैथुना द्वारे एच. आय. व्ही. होण्याची शक्यता खूप कमी असते. पण तरीही अशा प्रकारचे असुरक्षित संबंध आले असल्यास एच. आय. व्ही. ची चाचणी करून घेण्यास हरकत नाही. एच. आय. व्ही ची लागण झाली आहे का? हे रक्ताच्या चाचणीतून कळू शकेल. एलायझा या चाचणीची किंमत कमी असल्याने मुख्यतः याच चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीची मर्यादा अशी की, एच. आय. व्ही ची लागण झाल्यावर तीन महिन्याच्या आत ही चाचणी केली, तर ती बिनचूक उत्तरं देईलच असं नाही. म्हणूनच या तीन महिन्यांना ‘गवाक्ष काळ’ (विंडो पिरिअड) म्हणतात. शेवटच्या असुरक्षित संभोगाच्या तीन महिन्यांनंतर या चाचणीतून त्या तीन महिन्यापूर्वी किंवा त्याच्या अगोदर केलेल्या असुरक्षित संभोगातून एच. आय. व्ही ची लागण झाली आहे का ते समजू शकतं. तसेच इतर आजारांप्रमाणे या आजारात लागण झाल्यावर सुरवातीची अनेक वर्ष कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कालांतराने जसजशी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तसतसे विविध आजार होऊ लागतात यांना संधिसाधू आजार असे म्हणतात. या संधिसाधू आजारांमध्ये जुलाब, न्यूमोनिया, क्षयरोग, इ. आजार होतात. याशिवाय मेंदूच्या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टीत, बोलण्या-चालण्यात फरक पडणे असे परिणाम दिसतात.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा