प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका मुलाने हा प्रश्न विचारला आहे.कि त्याला क्लास मध्ये ज्या madam शिकवण्यासाथी येतात त्यानच्या सोबत त्याला सेक्स करायचा आहे.या उत्तर काय असेल.

एका मुलाने हा प्रश्न विचारला आहे.कि त्याला क्लास मध्ये ज्या madam शिकवण्यासाथी येतात त्यानच्या सोबत त्याला सेक्स करायचा आहे.या उत्तर काय असेल.

1 उत्तर

मुलं या आडनिड्या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जात असतात. वयात येताना होणारे हे बदल त्यांच्या आचार विचारांना खूप प्रभावित करतात. प्रेम, लैंगिक आकर्षण या भावना तीव्रतेने जाणवतात आणि ते त्याला आपसूकच प्रतिसाद देतात. त्यात गैर, अस्वाभाविक काही नाही. त्यातच मोठ्या वयाची मुलं, मित्र (पिअर्स) अनेक प्रेशर्स या मुलांवर टाकू शकतात, हे होतं. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून अनेकदा, बळेच मुलं स्वतःला सिद्ध वगेरे करण्यासाठी काही धोके पत्करण्याची शक्यता असते. त्यांना वेळीच सावरायला हवं.

आपल्या प्रश्नातील या दोघांच्यापैकी (मुलगा किंवा शिक्षिका) कोणीही १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचा/वयाची असेल आणि त्यांच्या लैंगिक संबंध आले तर दुसऱ्या व्यक्तीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो आणि त्यासाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो. इथे जर हा मुलगा मायनर म्हणजेच बालक असेल आणि त्या दोघांच्या संमतीने (मुलगा मायनर असल्या कारणाने त्याची संमती गृहीत धरली जात नाही) जरी संबंध आले असं एक वेळ मानलं तरी त्या मुलीवर बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. ही झाली कायद्याची तांत्रिक बाजू.

आता या मुलाला जर असे वाटत असेल तर त्याला हे समजावून सांगितले पाहिजे की आपल्याला वाटते म्हणून एखादी गोष्ट होत नसते किंवा करता येत नाही. शिवाय हेही समजावले पाहिजे की योग्य वयात योग्य त्या गोष्टी केल्या तर त्या अधिक श्रेयस आणि सुखकारक असतात. त्याला जे वाटते ते तसे वाटण्यात मात्र काही गैर नाही. पण ते प्रत्यक्षात यायलाच हवे हा हट्ट नको. यातून त्या बाईंच्या मर्जीशिवाय, संमती शिवाय काही घटना जर घडली तर त्या या विषयीची पोलिसात तक्रार करू शकतात, त्यांनी ती करायला हवी आणि या मुलाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 7 =