प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएका रात्रीत एकदा सेक्स केल्यावर परत करायची इच्छा का होत नाही?किमान 2 वेळा सेक्स करावा अशी इच्छा असते

1 उत्तर

तुमच्या प्रश्नामधेच किती विरोधाभास आहे. इच्छा होत पण नाही म्हणता अन इच्छा होते असे पण म्हणत आहात.
जर इच्छा नाही होत तर 2 वेळा करण्याचा अट्टाहास का? ही काही कंपनीने ठरवून दिलेले टार्गेट आहे का? की ही कुणाशी लावलेली पैज आहे?
लैंगिक क्रिया ही आनंद देण्यासाठी घेण्यासाठी आहे, सोबत असण्यात आहे. इथे फक्त सुख अनुभवायचं आहे, बस्स! ही काही रेस नाही जी जिंकायची आहे.
तेव्हा इच्छा होत असल्यास हव्या तेवढ्या वेळा संभोग करा पण गरज नसेल वाटत तर बळे बळे नका करू.
अजून एक तुम्हाला एकट्याला करावसं वाटतं म्हणूनही करू नका, तुमच्या जोडीदाराचीही इच्छा गरजेची आहे. तेव्हा त्यांची पण संमती घ्या अन जर त्यांची संमती नसेल तर संबंध करू नका.
यातून प्रेम वाढतं, विश्वास दृढ होतो एकमेकावरचा, नातं बहरतं
खूप शुभेच्छा!

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 10 =