प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएखाद्या मुलीने किती वेळा संबंध ठेवले आहेत हे कसे ओळखावे?

1 उत्तर

हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. कोणी कोणासोबत आणि कितीवेळा सेक्स करायचा हा त्या त्या व्यक्तींचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यामुळे त्यात इतरांनी लक्ष न घालणेच योग्य. एखाद्या पुरुषाने किंवा स्त्रीने किती वेळा सेक्स केला हे जाणून घेण्यात इतरांना इंटरेस्ट असण्याचे कारण नाही.

आता तुझ्या प्रश्नातील भाषेविषयी बोलूयात. झवने/झवले यांसारखे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. काहींना पर्यायी शब्द माहित नसतात हे आम्ही समजू शकतो. पण मुद्दामहून जर असे शब्द वापरत असशील तर मात्र पर्यायी शब्द शिकून घे आणि त्याची सवय कर. सेक्सविषयी, स्त्रीविषयी बोलताना, तिच्या शरीराचा, लैंगिक अवयवांचा उल्लेख असाच करणार असशील तर कोणत्याही स्त्रीला ते आवडणार नाही. प्रत्यक्ष संबंधांमध्ये ज्या स्त्रीशी संबंध करशील तिच्या शरीराविषयी आदरच असायला पाहिजे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 6 =