एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.
जर तिघांपैकी कोणालाही एचआयव्हीची लागण झालेली नसेल तर काहीही धोका नाही.
परंतू एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्गही आहेत. ते पुढीलप्रमाणे
• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
• दूषित रक्त आणि
• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.