प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsओळखीच्या बाईला सेक्स करायला मागितल्यावर ती देईल
1 उत्तर

आपल्या पुरुषसत्ताक समाजामध्ये स्त्रियांकडे केवळ सेक्ससाठी पाहणार्यांसचा मोठा वर्ग आहे. बाई म्हणजे एखाद्या वस्तूप्रमाणे वापरायची गोष्ट नाहीये मित्रा. थोडा मोठा हो. माणसासारखा विचार कर. व्यक्ती ओळखीचा असो की अनोळखी प्रश्न असतो त्याच्या संमंतीचा. तुला ज्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे अगदी तसंच आकर्षण त्या व्यक्तीला असेलच असं नाही. व्यक्तिंची मानसिक आणि शारीरिक तयारी असावी लागते. संभोग/सेक्स करणं ही एक जबाबदारीची क्रिया आहे. खरतरं कोणत्याही नात्यामध्ये जबदस्तीने केलेली कोणतीही लैंगिक कृती बलात्कारच म्हणायला हवी.

थोडा वेळ घे, विचार कर. आकर्षणं असणं नैसर्गिक आहे. ते कसं व्यक्त करायचं हा व्यक्तीगत प्रश्न असू शकतो. कोणतीही लैंगिक नाती तयार करण्यापूर्वी त्याच्या परिणांमाबाबत जागृत असणं महत्वाचं असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 5 =