काय करू ? asked 7 years ago

माझे ल्ग्न होऊन 11 वर्ष झाली.मी शिक्षिका आहे.मला अजूनही मुल नाही.नवरा कधीच मला जवल घेत नाही. म्हनून मी माज़्या एका student सोबत फक्त एकदाच नग्नावस्थित संभोग केला.मला आता kलाजल्यासारखेहोते कारन मी आता गर्भवती aराहिली आहे.शिवाय तो मुkलगा मला अजून एकदा तुझे शरीर दे अशी मागनी करतोय .माझा ह्यास नकार आहे तरी तो लग्न कर अशी मागनी करतोय.मला तो आवडतो मात्र माझे वय34 आहे त्याचे 22 आहे. त्यात मला फक्त त्याच्याशी लेंगिक संबंध ठेवायचा jहोता.माझा नवराही माझावर चिडतो. कारन मी pregnent आहे हे त्याला समजले . मी काय करु समजेना.mमी त्या मुलासोबत पलून जाउ का? की उsघडपने त्याच्याशी लग्न करु. की असेच ईतरांशी संबंध ठेऊ.

1 उत्तर
Answer for काय करू. answered 7 years ago

या सगळ्यामध्ये तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे मदत करणारी एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेले प्रसंग, त्या प्रसंगाशी संबंधित व्यक्ती (नवरा, लैंगिक जोडीदार-२२ वर्षाचा तरुण आणि तुमचे होणारे बाळ) आणि तुमच्या मनातील विचार, भाव-भावना अगदी चांगल्याप्रकारे जाणता. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हालाच. आणि तुम्ही तो घेऊ शकता. आपल्याकडे लैंगिकतेविषयी बोलण्याची मोकळीक नसताना देखील तुम्ही हा प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारला आहात हेच निर्णयाकडे जाणारं एक पाऊल आहे.

तुमच्यासाठी योग्य काय हे तुम्हीच अधिक जाणता त्यामुळे आम्ही इथे बसून तुम्हाला निर्णय सांगणे योग्य ठरणार नाही. पण निर्णय घेताना खालील गोष्टींचा नक्की विचार करा ज्याची तुम्हाला निर्णय घ्यायला कदाचित मदत होईल.

१. तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे आतापर्यंतचे सहजीवन आणि इथून पुढचे सहजीवन तुम्ही कसे बघता? तुम्ही एकमेकांसाठी पूरक, एकमेकांसोबत समाधानी आणि आनंदी आहात का? तुमच्या सहजीवनामध्ये तुम्हाला काही आशेचा किरण दिसतो का?

२. तुमच्या नवऱ्यास शरीरसंबंध नको आहेत. त्याच्यासोबत एकदाही शरीरसंबंध आला नसल्यास कायद्याने तुमचा विवाह सफल झालेला नाही. अशा वेळेस विभक्त व्हावे किंवा नाही हा निर्णय तुम्ही करावा. विवाह म्हणजे भावरहित शरीरसंबंध अशी तुमची कल्पना आहे काय?

३. जेव्हा विवाहानंतर नवरा बायको यांचा शरीरसंबंध येतोतेव्हा विवाहाची परिपूर्ती consummation झाली असे कायदा मानतो. तसे झाले नाही तर विवाह रद्दबातल annulment झाला असा आदेश मिळविता येतो. हा घटस्फोटाशिवाय विभक्त होण्याचा प्रकार आहे.

४. तुमच्या आणि पतीच्या लैंगिक आयुष्यामध्ये असणाऱ्या तणावाविषयी तुम्ही दोघांनी मिळून कधी संवाद साधला आहे का? इतर कोणाची मदत घेतली आहे का? हा ताण दूर करण्याजोगा आहे का?

५. लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भनिरोधकांचा वापर करणे आवश्यक आहे.

६. तुमची त्या तरुणाशी लग्न करण्याची मानसिक तयारी आहे का? या निर्णयामुळे तुमच्या, तुमच्या बाळाच्या आणि त्या तरुणाच्या आयुष्यावर होणारा संभाव्य परिणाम (चांगला-वाईट) आणि त्याला सामोरं जाण्याची तुम्हा दोघांची तयारी/क्षमता याचा डोळसपणे विचार करावा असे आम्हाला वाटते.

७. राहिला प्रश्न तुमच्या मनातील शेवटच्या पर्यायाचा. तो म्हणजे आहे तसं आयुष्य सुरु ठेऊन असेच इतरांशी लैंगिक संबंध ठेवण्याचा. यासाठी तुम्हाला तुमच्या लैंगिक सुखाच्या, लैंगिक आयुष्याच्या कल्पना काय आहेत हे शोधावे लागेल. तुम्हाला कसे लैंगिक आयुष्य आवडेल? त्यातून तुम्हाला पुढे जाऊन मानसिक त्रास, ताण जाणवणार नाही याची काळजी घ्या. तुमची आणि तुमच्या लैंगिक जोडीदाराची संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 15 =