प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsकाळी त्वचा : माझ्या girlfriend च्या त्वचेचा रंग गोरा आहे. पण तिच्या योनीच्या आजुबाजुची त्वचा काळी आहे. हे अस्वच्छतेमुळे आहे का? यावर काही उपाय आहे का? तिच्याशी संबंध आल्याने त्वचा रोग होण्याची शक्यता आहे का?

1 उत्तर

लिंग आणि योनी शरीराच्या एका ठराविक भागामध्ये आहेत. शरीराच्या तापमानापेक्षा इथलं तापमान थोडं वेगळं असतं. त्यामुळं शरीराच्या त्वचेपेक्षा लिंगाचा किंवा योनीचा रंग वेगळा असू शकतो. तुम्ही शरीराची अधिक पाहणी केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या तळपायाचा रंग आणि पायाच रंग हा देखील वेगळा आहे.

अनेकवेळा पॉर्न क्लिप्स किंवा ब्लू फिल्म पाहून पुरुषांच्या काही कल्पना तयार होतात. परंतू हे नेहमी लक्षात ठेवा, पॉर्न क्लिस या कल्पनारंजन करुन बनवलेल्या असतात. शिवाय अनेकवेळा त्यात दाखवलेले लिंगाचे किंवा योनीचे आकार, रंग तितकेसे खरे नसतात. त्यामुळं अशा क्लिप्स पाहून मनामध्ये कोणताही न्यूनगंड किंवा अहंकार तयार करण्याची गरज नाही.

रंग कोणताही असला तरी प्रेम तेच असतं. त्यात काही फरक पडत नाही. त्यामुळे रंग बदलण्याचा उपाय करण्याची काही गरज नाही आहे, आहे त्याचा स्विकार करा. अन तिच्याशी संबंध आल्याने त्वचा रोग होण्याच्या शक्यतेचाही काही प्रश्न नाही, हे तर तुमच्या लक्षात आलं असेलच ना?

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 2 =