प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsगर्भनिरोधक गोळ्यांवर १००℅ sure राहु शकतो का? गोळ्या घेतल्यावर बिनधास्त सेक्स करू शकतो का काहि काळजी घ्यावी?

गर्भनिरोधक गोळ्यांवर १००℅ sure राहु शकतो का? गोळ्या घेतल्यावर बिनधास्त सेक्स करू शकतो का?

1 उत्तर

गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करताना त्यांचा फायदा काय आणि त्यांचे धोके काय या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या गरभनिरोधक पद्धती मासिक पाळीच्या चक्रामध्ये किंवा स्त्री बीज तयार होणं आणि अंडोत्सर्जन या प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात तसंच ज्या पद्धती किंवा साधनांवर आपलं नियंत्रण नाही त्या पद्धती किंवा साधनांना धोकादायक गर्भनिरोधकं म्हटलं जातं. यांचा वापर करण्याआधी या पद्धतींचे संपूर्ण शरीरावर होणारे परिणाम जाणून घेणं गरजेचं आहे.
संप्रेरक इंजेक्शन – नेट एन किंवा डेपो प्रोवेरा नावानं बाजारात आलेलं हे इंजेक्शन संप्रेरकाचा वापर करते. इंजेक्शनचा प्रभाव 3 महिने राहतो. संप्रेरकामुळे स्त्री बीजाची वाढ रोखली जाते, अंडोत्सर्जन होत नाही ज्यामुळे गर्भधारणा होत नाही. संप्रेरकाच्या प्रभावामुळे गर्भाशयाचं अस्तर वाढत नाही आणि त्यामुळे गर्भ रुजू शकत नाही.
या पद्धतीचे संपूर्ण शरीरावर परिणाम होतात. मासिक पाळी अनियमित होणे, हाडं ठिसूळ होण्याची आणि स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढणे हे या पद्धतीचे सर्वात मोठे धोके आहेत.
संप्रेरकयुक्त इंप्लांट – नॉरप्लांट या नावाने बाजारात आलेलं हे गर्भनिरोधक म्हणजे त्वचेखाली बसवण्याचं एक साधन आहे. सिलिकॉनच्या 6 (आता 2) पातळ पट्ट्यांमध्ये लेवोनॉरजेस्टेरॉल हे संप्रेरक असतं जे त्वचेतून पूर्ण शरीरात पाझरतं. हे गर्भनिरोधक पाच वर्षं प्रभाव करतं. स्त्री बीजाची वाढ थांबंवणं, अंडोत्स्र्जन थांबवणं आणि गर्भाशय व योनिमार्गातील स्राव घट्ट करणं जेणे करून पुरुषबीजं जिवंत राहू शकणार नाहीत अशा रीतीने नॉरप्लांट काम करतं.
या गर्माभनिरोधकाच्या वापरामुळे पाळीमध्ये बिघाड, डोकेदुखी, नैराश्य, चिंता, वजन वाढणे, चक्कर येणे असे अनेक दुष्परिणाम पाहण्यात आले आहेत.
संप्रेरक इंजेक्शन तसंच इंप्लांट या दोनही प्रकारच्या गर्भनिरोधकांवर वापरणाऱ्या स्त्रीचं नियंत्रण नसतं आणि एकदा वापर सुरू केल्यावर ती सहजासहजी थांवता येत नाहीत. त्यामुळे या दोन्ही गर्भनिरोधकांना स्त्री संघटना आणि आरोग्य चळवळीनेही विरोध केला आहे.
अधिक माहितीसाठी:
(http://www.locostindia.com/CHAPTER_4/Drug Marketing_12.htm
किंवा
http://www.ijme.in/index.php/ijme/article/view/702/1715)

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 7 =