प्रश्नोत्तरेजर गर्भ धारणा हवी असेल तर संभोग कोणत्या काळात करावा

1 उत्तर

मासिक पाळीचे  चक्र हे सर्वसाधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे असते. या काळात एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यासाठी पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला की त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. बऱ्याच जणांचा असा समाज असतो की अंडोत्सर्जन १४ व्या दिवशीच होत. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशीराही होत असत. प्रत्येकाचा मासिक चक्राचा काळ वेगळा असल्यामुळे अंडोत्सर्जनाचा काळ ही वेगळा असू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आपल्या वेबसाईट वरील  https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वर क्लिक करा.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 9 =