प्रश्नोत्तरेCategory: Private Questionतोंड येणे व हस्तमैथुन

Namaskar..Mala sarkhe tond yete (mouth ulcer)Yache nemke karan kay asu shakte.. sarkhe hastmaithun kelyane hote ki hastmaithun na kelya mule hote? Kay upay ah. Ha question vicharava lagtoy karam mi Dr. Shi consult kele tar tyani medicins dele pn mala maze ling dakhavayla lavle..pn kahi bolle nahi fakt ok mhanale. Tyani ka pahile asel linga?

1 उत्तर

तोंड येणे आणि हस्तमैथुन याचा काही संबंध नाही. डॉक्टरांनी लिंग नेमके का दाखवायला सांगितले हे तेच सांगू शकतील. पण हस्तमैथुनामुळे तोंड येत नाही हे मात्र नक्की. लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 3 =