सर माझं वय तीस आहे मला दाढी व मिशा फारच कमी आहेत तसेच त्यांची वाढ एकदम कमी आहे माझ्या मित्रा मध्ये मी फारच लहान दिसतो फार डिप्रेशन येत काय करू काही उपाय

1 उत्तर

खरंतर आपण निसर्गतः जसं असतो तसेच खूप सुंदर असतो. इतरांशी तुलना करून स्वतःचा आत्मविश्वास आणि प्रतिमा कमी करून घेण्याचं काहीच कारण नाही. दाढी मिशा असणं किंवा नसणं यावरून कुणाचं व्यक्तित्व किंवा कर्तृत्व ठरवणं चूकच आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मनातील न्यूनगंड, नकारात्मक विचार काढा.

आता जरा दाढी मिशा येण्यामागचं विज्ञान समजून घेऊ यात. मुलग्यांना चेहऱ्यावर मिशा आणि दाढी किंवा छातीवर आणि एकूणच अंगावर केस असण्यासाठी एक विशिष्ट संप्रेरक कारणीभूत असतं. त्याचं नाव आहे टेस्टेस्टेरॉन. अर्थात ह्या संप्रेरकाच्या अस्तित्वामुळेच पुरुष स्त्रियांपासून वेगळे दिसतात आणि असतात. ह्या आणि अशा इतर काही संप्रेरकांच्या प्रभावमुळेच मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजे मुलग्यांच्या बीजकोशात पुरुष बीज आणि वीर्य कोशात वीर्य निर्मितीसोबतच तोंडावर, छातीवर आणि जांघांमध्ये केस येणे, आवाजातील बदल, स्नायूंचा विकास ई सर्व बदल ह्या संप्रेरकांच्या प्रभावातूनच होतात.

तुमचे वय तीस आहे आणि तुम्हाला मिशा अथवा दाढी येत नाही आहे असे दिसत असेल तर कृपया तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उचित ठरेल. ते तुम्हाला योय मार्गदर्शन करतील. ह्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग अथवा सल्ला कोणी देत असेल उदा. अमुक तेल वापरा अथवा तमुक फळ खा तर सजग असा इतकेच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 13 =