प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदोघेही सज्ञान, जाणते, सर्व गोष्टींची जाणीव असलेले, दोघांची एकत्र येण्यास काहीच हरकत नाही मात्र एकत्र यायला सुरक्षित जागा मिळत नाही, lodges नको ती शहानिशा करतात

.

1 उत्तर

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. सज्ञान, जाणत्या, जोडीदाराचा सन्मान राखणाऱ्या, जबाबदारीची जाणीव असणाऱ्या, दोघांना एकत्र यायला काहीच हरकत नाही. एकत्र येणं , एकमेकांना वेळ देणं आणि सेक्स ही एकमेकांवरील प्रेमाची, शारीरिक ओढीची अभिव्यक्ती असू शकते. ती एक आदिम, मानवी प्रेरणा आहे. आदिम काळापासून स्त्री, पुरुष एकमेकांकडे आकर्षित होऊन समागम करत आले आहेत. मानवी इतिहासाच्या पुढच्या टप्प्यावर लग्न किंवा विवाह या संकल्पना अस्तित्वात आल्या. सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर एकत्र येण्यास किंवा सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे. त्याच्या परिणामांची माहिती आधीच असणं आवश्यक आहे. एकत्र यायला सुरक्षित जागा न मिळाल्यामुळे, अनेकजण बागा, लॉज यासारख्या ठिकाणी एकत्र येतात. अशा जागाही सुरक्षित नाहीत. अशा ठिकाणी कोणीतरी गैरफायदा घेणं , मुलींवर अत्याचार होणं , संस्कृतीच्या रक्षणाचा ठेका घेतलेल्यांनी कारवाई करणं , दोघांना दमदाटी करणं, , ब्लकमेल करणं अशा अनेक घटना घडल्याचे आपण पाहतो . अशाठिकाणी खाजगीपणा जपणेही शक्य होत नाही. याशिवाय दोघांनाही विशेषतः मुलींना बदनाम होण्याची जास्त भीती असते. शिवाय अशा ठिकाणी घाईघाईत एकत्र येणं होते याचा दोघांवरही वेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो आणि नात्यावरही परिणाम होऊ शकतो.  यापैकी कोणताही धोका नसेल अशा सुरक्षित जागा शोधणे खरंच  जिकिरीचं  असू शकतं. इच्छा, संमती आणि जबाबदारीची जाणीव असणाऱ्या अशा दोन सज्ञान लोकांना आपल्या समाजात एकत्र यायला मिळत नाही, हे खरंतर दुर्दैवाची गोष्ट आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 2 =