प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळीच्या दुसर्या दिवसीपासुन आठ दिवस तिला बिना कंडोम संभोग करावा का?

1 उत्तर

गर्भधारणा नको असेल तर गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. महिन्यातील सर्वच दिवस गर्भधारणेसाठी पूरक नसतात. गर्भधारणेसाठी अंडोत्सर्जन ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असते. मासिक पाळीच्या १२ ते १६ दिवस अगोदर अंडोत्सर्जनाची प्रक्रिया घडते. परंतू अंडोत्सर्जन नक्की कोणत्या दिवशी होईल हे सांगणं कठीण असतं. शिवाय केवळ बाह्य लक्षणांवरुन अंडोत्सर्जन झालं आहे हे कळणं कठिण आहे. शिवाय प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळी चक्र वेगवेगळ्या दिवसांचं असतं. कधी आजारपणामुळं किंवा मानसिक तणावामुळं पाळी चक्र मागे-पुढे देखील होतं. त्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा कंडोम वापरलेला कधीही चांगला, नाही का!

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =