प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रश्नोत्तरे (तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही..!) प्रश्नोत्तरे (तुमची ओळख कुठेही उघड होणार नाही..!) olakh lapavnyachi kay avshykta ? sex education baddal bolat ahot tyat vait kay? shevti ha pan ek mahtwacha vishay ahe.
1 उत्तर

तुमचं म्हणणं पूर्णपणे खरं आहे. लैंगिकतेचा प्रश्न महत्त्वाचा तर आहेच पण नाजूकही आहे. आपल्या समाजात अजूनही लैंगिक संबंध, सेक्स, लैगिकता या विषयांवर उघडपणे बोललं जात नाही. लैंगिकतेबद्दल प्रत्येकाच्या मनात शंका असतात, प्रश्न असतात किंवा मतं असतात पण ती मांडण्यासाठी किंवा त्याची उत्तरं मिळवण्यासाठी जे मोकळं वातावरण आजूबाजूला असायला पाहिजे ते मात्र आपल्या समाजात आजही उपलब्ध नाही. आणि असेलच तर फार कमी जणांसाठी ते उपलब्ध आहे. ज्या आपल्या समाजात आजही कपड्यांबद्दल, राहण्या-बोलण्याबद्दल किती तरी बंधनं घातली आहेत. आजही जीन्स घातली म्हणून जीव घेतला जातो. जात-पात-धर्म अशा बेड्याही आहेतच. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे लैंगिक नाती ठेवता येतीलच असं नाही. 
लैंगिकतेबाबत समाजमान्य असणाऱ्या आणि समाजाला मान्य नसणाऱ्या पण आपल्याला स्वतःला जाणवणाऱ्या अशा अनेक भावना, अनुभव असतात. ते मोकळेपणाने मांडण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण मात्र सगळ्यांना मिळतं असं नाही. कधी कधी मनातल्या शंका विचारल्या तरी त्याला समाज मान्यता देत नाही. आणि लैंगिकतेबाबत एक प्रकारचा कलंक, स्टिग्मा समाजात अजूनही आहे.
या वेबसाइटचा उद्देश लैंगिकतेबद्दल मोकळा संवाद व्हावा असाच आहे. पण हे करताना कुणाला जर आपली ओळख प्रकट करायची नसल तर तो खाजगीपणाचा हक्क जपण्यास आम्ही बांधील आहोत. प्रश्न कुणी विचारला यापेक्षा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळालं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कधी कधी विचारलेले प्रश्न संवेदनशील असू शकतात त्यामुळे तिथे नाव उघड न होणंच गरजेचं आहे. आणि ते आम्ही कटाक्षाने पाळलं आहे. कितीही साधा किंवा खाजगी प्रश्न असला तरी विचारणाऱ्याचं नाव, किंवा कसलीच ओळख आम्हालाही कळत नाही आणि त्यामुळे इतरांनाही.
ज्यांना त्यांच्या नावासकट प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी ते जरूर विचारावे, पण तसं बंधन नाही.    

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 17 =