प्रश्नोत्तरेबायको सेक्सी तरीही नवरे दुसर्याच्यां बायकांवर डोळा का ठेवतात

1 उत्तर

एकपत्नीत्व किंवा एकपतित्व हे मुळातच अनैसर्गिक आहे. लैंगिक भावना, आपल्या सारखा जीव जन्माला घालण्याची भावना ही आदिम भावना आहे. लग्न, कुटुंब, समाज ह्या संस्था माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या संस्था आहेत. एकाच जोडीदारासोबत लग्न करणे, सेक्स करणे आणि जन्मभर राहणे ह्या सामाजिक गोष्टी आहेत.

लैंगिक आकर्षण वाटणे ही एक मुलभूत प्रेरणा आहे मग ते समलिंगी व्यक्तीबद्दल असो किंवा विषम लिंगी व्यक्तीबद्दल. पुरुष काय किंवा स्त्रिया काय किंवा समलिंगी, ट्रान्सजेन्डर व्यक्ती काय ह्या एकापेक्षा अधिक व्यक्तींकडे आकर्षित होणारच. त्यामुळे जसे नवरे इतर बायकांकडे आकर्षित होतात तशाच बायका ही इतरांच्या नवऱ्यांकडे आकर्षित होऊ शकतात.

ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अर्थातच आपला समाज, संस्कृती, रूढी कल्पना, कुटुंब वगेरे व्यवस्था आणि सामाजिक मानसिक वगेरे सुरक्षितता अशा मुद्द्यांशी संबंधित आहे. यांचा विचार करता स्त्री पुरुष जरी इतर स्त्री पुरुषांकडे आकर्षित होत असले तरी आपल्या जोडीदारासोबत एकनिष्ठ राहण्याचा बहुतेक वेळेस प्रयत्न करताना दिसतात.जे तसे राहत नाहीत त्यांना नातेसंबंधावर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 4 =