ही तुमची कल्पना तर नाही ना? प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसर्या सोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. पण सरासरी बघता पुरुष संभोग ४ ते ५ मिनिटे चालतो. दारू/ नाश किंवा काही विशिष्ट औषध घेऊन संभोग करतो का ? आपल्याला जननेन्द्रीयांची संवेदनशीलता कमी करणारे आजार आहेत का? अशा असंख्य गोष्टींवर संभोगाचा कालावधी असतो.
एवढंच सांगून तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते अपूर्ण ठरेल. कोणी कोणासोबत सेक्स करायचा आहे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण खालील काही गोष्टी आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे.
१. तुम्ही कोणाची फसवणूक तर करत नाही ना?
२. अशा संबंधांमध्ये नात्यांमधील गुंतागुंत असते त्यामुळे तुमच्या नात्यावर अशा संबंधांचा काय परिणाम होत आहे किंवा होईल याचा आवर्जून विचार करा.
३. लैंगिक संबंधांमध्ये संमती खूप महत्वाची असते. एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.
४. लैंगिक संबंध ही जबाबदार कृती असल्याने त्याची जबाबदारी घ्या.
५. असे संबंध उघडकीस आले तर बदनामीला सामोरं जावं लागतं. विशेषतः स्त्रीला बदनामी आणि त्यातून होणारी हिंसा याला सामोरं जावं लागतं याची जाणीव ठेवा.
शेवटी निर्णय तुमचा पण त्या निर्णयाची जबाबदारी देखील घ्या. पुढे जाऊन माझा काही संबंध नाही असं म्हणून हात वर करू नका.