बायको asked 7 years ago

मि 47 वर्षाचा विवाहितआहे। मला 2 मुलेआहेत। माज़ी बायको 32 वर्षाची आहे। तिचा सेक्स साठी नकार आहे पन मला गरज आहे। सेक्स च्या कारणाने ती तलाक सुद्धा मागु शकते। तिचे 5 वर्ष बाहेर संबंध होते , ते आता बंद जाले तरी ती सेक्स नाहीच म्हणते। माझ्यावर तिने कधीच प्रेम केले नही ती जबरदस्ती ने 19 वर्ष माझ्याबातोबर राहिली अस तिचे म्हणणे आहे। काय करू।

1 उत्तर
Answer for बायको answered 7 years ago

तुम्ही दोघंही गेली १९ वर्ष एकमेकांसोबत आहात. एकमेकांना ओळखता. शिवाय अनुभवी आहात. त्यामुळं या सगळ्याविषयी दोघं मिळून संवाद साधा. नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. खालील काही मुद्द्यांचा मात्र नक्की विचार करा.

१. संवाद म्हणजे दोषारोप आणि भांडण नव्हे. तुमची जशी एक बाजू आहे तशीच तुमच्या जोडीदाराची देखील. इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लादले गेलेले लग्नाचे नाते टिकवणे हे खूप मोठे प्रेशर आहे. कोणासाठीही. त्यामुळे त्यांचेदेखील ऐकून घ्या. तुमचे म्हणणे त्यांना शांतपणे सांगा.

२. तुमच्या या नात्यामध्ये दोन मुलं देखील आहेत त्यामुळे तुमच्या सहजीवनाचा तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यावेळी त्यांच्याबद्दल देखील नक्की विचार करा. जबाबदारी घ्या.

३. तिचे बाहेर संबंध होते ही तुमची शंका आहे का खरेच तसे होते? त्याची कारणे काय? हे देखील बोलायला पाहिजे.

४. कारण कोणतेही असो. कोणत्याही व्यक्तीसोबत इच्छेविरुद्ध सेक्स करणे चूकच आहे. कायद्याने गुन्हाच आहे तो. मग ती नवरा-बायको का असेनात.

शांतपणे या सर्व गोष्टींचा विचार करा. बायकोबरोबर मोकळेपणाने बोला, नक्की काहीतरी मार्ग निघेल. गरज पडल्यास एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 7 =