प्रश्नोत्तरेबाहेर सेक्स करावा का?

मला बाहेर जाऊन सेक्स करायची खुप ईच्छा होते. बुधवार पेठ वगैरे सारख्या ठिकाणी जावे का? ते कायदेशीर असतं का? काय अडचणी येतात? मोठ्या शहरात गेल्यावर त्या ठिकाणच्या रेड लाईट एरीयात जाऊ शकतो का?

1 उत्तर

खरेतर, कोणी कोणाबरोबर सेक्स करायचा ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे.
जरी सेक्स वर्क भारतात अवैधानिक/बेकायदेशीर मानले नसले तरी त्या आजूबाजूचे नियम हे बरेच किचकट आहेत. जसे कि सार्वजनिक ठिकाणी किंवा १८ वर्षाहून कमी(अल्पवयीन) वयाच्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे हा दंडनीय गुन्हा आहे.
प्रत्येक व्यक्ती आयुष्यातील कोणतेही निर्णय स्वतःच्या नीती मूल्यांनुसार, आपल्याला कशामध्ये समाधान किंवा comfort वाटतो त्यावरून ठरवते.
अधिकृत मार्ग हे व्यक्तिनुसार वेगवेगळे असू शकतात. तुम्हाला काय बरोबर किंवा अधिकृत वाटते व काय चुकीचे किवा अनधिकृत वाटते हे शेवटी तुम्हीच ठरवता. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वाटणारा मार्ग तुम्ही निवडू शकता. तसेच आपण जे निर्णय घेतो त्याचे परिणामही (Consequences) त्यासोबत येतातच. तुमच्याबाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही कोणाशी संबंध ठेवले तरी किंवा नाही ठेवले तरी त्याचे परिणाम येणारच आहेत .त्यामुळे निर्णय आणि त्यांच्या परिणामांचा विचार करून जायचे का नाही हे तुम्हीच ठरवू शकता.
पण एका गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे. कोणत्याही एच आय व्ही किंवा लिंग सांसर्गिक आजार असणाऱ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध आला तर लैंगिक आजार होऊ शकतात. मग ती व्यक्ती सेक्स व्यवसाय करणारी असो किंवा इतर कुणीही. (जर संबंध ठेवताना निरोध वापरला तर गर्भधारणा तसेच लिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग टळतो.)
वेश्यावस्तीत जाताना खूप वेळा अपराधीपणा, भीती, काळजी अश्या काही भावना जाणवू शकतात. तसेच त्यामुळे आर्थिक तणावही जाणवू शकतो. पण ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या निर्णयाचा एक भाग आहे.
जर तुम्हाला याविषयी अजून बोलायचे असेल तर आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्ट. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 7775004350 या नंबरच्या व्हाट्सअप वर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नाममात्र शुल्कामध्ये सेवा देणारा आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 15 =