लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी संभोगामध्ये विविध पध्दतींचा अवलंब केला जातो. संभोग करताना लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी मुखमैथुन केलं जातं. मात्र कायद्याची अनैसर्गिक संभोगाची व्याख्या बरीच संभ्रमित आहे. भारतामध्ये नक्की किती टक्के महिला आणि पुरुष मुखमैथुन करतात याचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही. मात्र मुखमैथुन करण्यामध्ये गैर असं काही नाही. मात्र मुखमैथुन किंवा कोणतीही लैंगिक कृती करताना जोडीदाराची संमंती असणं आवश्यक आहे. अन्यथा कोणतीही लैंगिक कृती जोडीदारासाठी अत्याचारच ठरते.
"भारतातील स्त्री म्हणजे बायको" हे तु विचारलेल्या प्रश्नांमध्ये केलेलं विधान खटकलं. स्त्री म्हणजे केवळ बायको, बहीण, आई एवढंच नसतं. स्त्री एक माणूस आहे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.