प्रश्नोत्तरेमला अनियमित पाळी येते म्हणजे महिना पूर्ण व्हायच्या आधीच 5-7 दिवस अगोदर पाळी येते गेले 4-5 महिने झालेत असेच चालू आहे आमी पाळी आली की फक्त 1च दिवस अंगावर जाते कमीतकमी 3 दिवस अंगावर जायला हवं ना? माझ्यात अँड्रॉजेन च प्रमाण तर वाढलं नसेल ना करण माझ्या हात आणि पायावर केस पण आहेत?

2 उत्तर

१. प्रत्येकीचं पाळी चक्र वेगवेगळं असतं. हे २२ ते ३४ दिवसांचं असू शकतं. तुमचं पाळीचक्र २४ ते २५ दिवसांचं आहे असं दिसतंय. यात काळजी करण्यासारखे काहीच नाही.

२. पाळीच्या काळात साधारणपणे २ ते ४ चमचे म्हणजेच ३० ते ६० मिलीलीटर रक्त जातं. ३ ते ७ दिवस रक्तस्राव होतो पण यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. नियमितपणे तितकेच रक्त जात असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे गर्भधारणेस अडचण येणार नाही. तरीही शंका निरसन करण्यासाठी एखाद्या स्त्री-रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

३ . आता बोलूयात अंगावरील केसांबद्दल. आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरकं निर्माण करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात. या संप्रेरकांची जर योग्य प्रमाणात निर्मिती झाली किंवा गरजेपेक्षा जास्त झाली, तर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर आणि लैंगिक इच्छांवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात. अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. अचानकपणे केसांची वाढ झाली नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

४. स्त्रीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर तिच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 1 =