प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला मासीक पाळी येउन 10 दिवस झाले अता मी केव्हा सेक्स केकेल्यास.
1 उत्तर

तुमचा प्रश्न नेमकेपणाने कळत नाहीये. कदाचित तुम्हाला मासिक पाळीनंतर केव्हा गर्भधारणा होईल? हे विचारायचं आहे असं समजून उत्तर लिहित आहोत.

मासिक पाळी येण्याच्या आगोदर साधारण १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होतं. अंडोत्सर्जन झाल्यावर बीजनलिकेत हे स्त्रीबीज(अंड) २४ तासापर्यंत जिवंत राहू शकतं. जर या काळात संभोग होवून पुरुषबीज तिथं आलं तर गर्भधारणा होण्य़ाची शक्यता असते. इतर काळात गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. परंतू यातील महत्वाचा भाग असा की प्रत्येक स्त्रिचं पाळीचक्र कमी अधिक दिवसाचं असतं. त्यामुळं अंडोत्सर्जानाचा काळ तुम्हाला तुमच्या मासिक पाळीनंतर सांगणं कठीण असतं. जर तुम्हाला नियमित ठराविक दिवसांनी पाळी येत असेल तर पाळी येण्याच्या आगोदर १२ ते १६ दिवस अंडोत्सर्जन होतं हे लक्षात ठेवा.

अनेकवेळा मानसिक ताण तणाव किंवा आजारपणांमुळं अंडोत्सर्जना काळ बदलूही शकतो. यामुळं संभोग करताना गर्भनिरोधकं वापरणं किंवा जोडीदाराला वापरायला सांगणं महत्वाचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 1 =