प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला हस्तमैथुनाची सवय आहे तसेच मला सेक्स करण्याची तीव्र इच्छा होते.

मला हस्तमैथुनाची सवय आहे.
मी एखादी सुंदर मुलगी किंवा स्री पाहिली की मी माझ्या इच्छापुर्तीसाठी दिवसातुन दोन वेळा हस्तमैथुन करतो. माझे वय 20 वर्षे आहे कृपया यातुन काही अपाय होणार नाही ना ?

1 उत्तर

मनात लैंगिक भावना आल्या तर त्या शमवण्यासाठी हस्तमैथुन करण्यामध्ये काही गैर नाही. ते कितीदा करायचं याचे काही नियम नाहीत. ते प्रत्येकाच्या इच्छेवर आहे. मात्र एक गोष्ट समजून घे. हस्तमैथुन गैर नसलं तरी दर वेळी तू म्हणतोस त्याप्रमाणे एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री पाहिल्यावर तुला लैंगिक भावना निर्माण होत असतील तर मात्र थोडा विचार कर. मुलींकडे आणि स्त्रियांकडे तू फक्त लैंगिक दृष्टीनेच पाहतोस का? स्त्री म्हणजे सेक्स असं तुझ्या मनात का बरं येतं? स्त्रिया किंवा मुलींबरोबर फक्त सेक्स करायचं नसतं. त्यांच्याशी मैत्री करायची असते, त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायचं असतं. त्यांच्याबरोबर पुढे जाऊन एकत्र ऑफिसमध्ये किंवा इतरही कामाच्या ठिकाणी सहकारी म्हणून काम करायचं असतं. मुली म्हणजे फक्त त्यांचं शरीर नाही. त्यामुळे मुलगी किंवा स्त्री दिसली तर मनात फक्त सेक्सची इच्छा निर्माण होणं खरंच योग्य नाही.
तू अजून तरूण आहेस, आताच या गोष्टींचा विचार कर. लैंगिक भावना निर्माण होतील, त्यासाठी तू हस्तमैथुन करशील. त्यातून फार काही अपाय होणार नाही. पण मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाहीस तर ते मात्र तुझ्यासाठी नक्कीच धोक्याचं ठरू शकेल. मुलींशी बोलायला, मैत्री करायला शिक. फक्त त्यांचं शरीर न पाहता त्यांचा एक व्यक्ती म्हणून विचार करायची सवय लाव. तुझंच आयुष्य जास्त सुंदर होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी