स्त्री नसबंदीमध्ये शस्त्रक्रियेची जखम भरून यायला एक महिना वेळ लागतो, तसेच या काळात एक महिना गर्भधारणा होऊ नये म्हणून गर्भनिरोधक साधनांचा वापर करणं गरजेचं आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर जखम भरून आली आहे याची खात्री करून स्त्री जोडीदारांची संमती असेल तर संबंध ठेवायला काहीच हरकत नाही.