प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझं सख्खा मावस बहिणीवर एकतर्फी प्रेम आहे तीला सेक्स बद्दल कसे विचारावे
1 उत्तर

तुमच्या प्रश्नातील महत्वाच्या भागावर बोलू या. तुम्ही ज्या सामाजिक नात्यामध्ये आहात म्हणजे बहीण-भाऊ नात्याला विशेष महत्व आहे. अशा नात्यांमध्ये शरीरसंबंध करणं चुकीचं मानलं जातं. शिवाय प्रत्येक जाती-धर्मानुसार याचे नियमदेखील वेगळे आहेत. काही धर्मामध्ये मावस बहीणीसोबत शरीरसंबंध ठेवणं किंवा लग्न करणं निषिध्द मानलं जातं. तर काही धर्मांमध्ये त्याला वावगं समजलं जात नाही. याविषयी तुम्हाला कल्पना असावी. अशा नात्यामध्ये पुढे जाण्याआधी त्याच्या परिणामांबाबत जागरुक असणं आवश्यक आहे.

आता तुमच्या प्रश्नातील दुसर्याम भागाकडे वळू या. तुमच्या प्रश्नातील विरोधाभास म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकतर्फी म्हणता त्याचा हा अर्थ आहे की तिनं तुम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी होकार दिलेला नाही. अशावेळी समोरच्या व्यक्तीबद्दल गृहीतक बांधणं चुकीचं असतं. शिवाय प्रेम करणं म्हणजे केवळ सेक्स करणं नसतं. हे समजून घ्या. प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. शरीरसंबंध ठेवणं ही एक जबाबदार कृती आहे. या कृतीमध्ये दोन व्यक्ती सहभागी असतात. त्यामुळं यात दोघांची संमती असणं फार गरजेचं असतं. या कृतीमुळं येणार्याय जबाबदार्यांतची जाणीव तुम्हाला हवी. जसं जर गर्भधारणा झाली तर तुम्ही आणि समोरील व्यक्ती त्याची जबाबदारी घ्यायला मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहात का? हे स्वतःला विचारा. जर तुम्हाला केवळ लैंगिक आकर्षण असेल तर त्याला प्रेम म्हणणं योग्य राहणार नाही.

तुमच्या मावस बहिणीसोबत याविषयी बोला. तिचं मत महत्वपूर्ण आहे. अजून एक महत्वाचं तुमच्या प्रश्नामधून तुमचं वय लक्षात येतं नाही म्हणून. भारतीय कायद्यानुसार किमान वय वर्षे १८ शरीरसंबंध ठेवण्यासाठी योग्य धरलं जातं हे माहित असावं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 4 =