प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझा मित्रिनीचा १ वर्षे वयाच्या १४ व्या वर्षी सातत्याने वापर झाला असून तिला मासिक पाळीचा अनियमित पण यात आहे आता तिचे वय १६ आहे काय करावे सांगा

2 उत्तर

मुळात १४ व्या वर्षाच्या, आठरा वर्षाखालील मुलीच्या स्तनांना किंवा इतर लैंगिक अवयवांना हात लावणे, लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. हे त्या मुलीचे लैंगिक शोषणच आहे. स्वतःच्या लैंगिक सुखासाठी लहान मुलांचा वापर करणे निंदनीय आहे. असं जर कोणी करत असेल तर ताबडतोब त्या व्याक्तीविरोधी गुन्हा दाखल करा. बाल लैंगिक शोषणाचे लहान मुलांवर खूप दूरगामी परिणाम होत असतात. संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय हे कळण्याचं हे वय नाही. त्यामुळे इतक्या लहान वयाच्या मुलीबरोबर जर कुणी जबरदस्तीने किंवा फसवून, लबाडीने लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाविषयी बोलूयात. माझी पाळी फार लवकर येते किंवा माझी पाळी फार उशीराने येते अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत असतो. काही मुलींची पाळी 21-22 दिवसांनी येते तर काहींना दोन दोन महिने पाळी येत नाही. कधी कधी आजारपणात पाळी पुढे ढकलली जाते तर कधी प्रवासामुळे दगदग होऊन पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येते. प्रत्येकीचं पाळीचं चक्र जसं वेगळं असतं तसंच दोन पाळी चक्रांमध्ये पण फरक पडू शकतो. यासाठी पाळीची लांबी कशी ठरते ते समजून घेऊ या. डॉक्टर सांगतात बरोबर 14व्या दिवशी अंडोत्सर्जन होतं आणि 28 व्या दिवशी पाळी येते. पण खरं तर हे पूर्ण सत्य नाही. प्रत्येकीच्या शरीराची आणि पाळीच्या चक्राची गती वेगळी असते. सलमाची पाळी 30-31 दिवसांनी येते तर लिसाची पाळी बरेचदा 40 दिवसांनी येते. प्रियाची पाळी कधी चार आठवड्यांनी येते तर कधी कधी पाच आठवड्यांनी येते. जयाची पाळी 21 दिवसांनी येते. पाळीचक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्वाची घटना असते. एकदा का बीज बीजकोषातून बाहेर आलं आणि गर्भधारणा झाली नाही तर त्यानंतर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरू होते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधीचा काळ मात्र निश्चित असतोच असं नाही. तो बदलू शकतो. प्रवास, मानसिक ताण, औषधोपचार अशा विविध कारणांमुळे हा काळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. मात्र अंडोत्सर्जन झाल्यानंतर मात्र 16 दिवसात पाळी येते. त्यामुळे लवकर का उशीरा यापेक्षाही आपलं स्वतःचं पाळीचं चक्र कसं आहे ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 6 =