प्रश्नोत्तरेमाझी गलं फेड मला सेक्स कर् देत नाहीं मि काय कर्

1 उत्तर

उत्तर अगदी सोपं आहे. तिच्या इच्छेला मान द्या. सेक्स ही आनंदाने, एकमेकांच्या संमतीने करण्याची बाब आहे. जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध सेक्ससाठी दाबाव आणणं योग्य नाही. तिच्यावर तुमचं प्रेम आहे का?  असेल तर तुमचं नातं भावनिकदृष्ट्या घट्ट करण्याकडे जास्त लक्ष द्या. प्रेमाच्या नात्यामध्ये  सेक्सशिवाय इतरही अनेक गोष्टी असतात त्याचाही विचार करणे गरजेचे आहे.   मनात इच्छा नसताना, प्रियकराच्या दबावाखाली सेक्स करण्याचा अनुभव मुलींसाठी खरंच चांगला नसतो. तुम्ही तिच्या इच्छेला मान दिला तर तुमच्याविषयीचे तिचे प्रेम आणि आदर द्विगुणीत होईल. तुम्ही दोघं मनाने जवळ आलात तिची इच्छा, मानसिक तयारी असेल तेव्हाच सेक्स जास्त आनंददायी होऊ शकेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 20 =