तुमच्या प्रश्नातून तुम्ही एका लग्न झालेल्या मुलीवर प्रेम करताय हे समजले पण तिचे तुमच्यावर प्रेम आहे किंवा नाही याचा उल्लेख नाही. तीही तुमच्यावर तितकंच प्रेम करते का? ती तुम्हाला आवडते हे माहित असल्याने तुमच्या घरच्यांनी तुमच्या लग्नाचे बघायला सुरुवात करणे हे आपली आजची सामाजिक परिस्थिती बघता अगदी स्वाभाविकच आहे. आपल्या समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रेम संबंधाला मान्यता मिळत नाही हे वास्तव आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिच्यावर तुम्ही प्रेम करताय तिचे लग्न झालेले आहे. तिचा नवरा तीला पटवून घेत नाही असे तुमचे म्हणणे आहे. पण ती ‘तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नाते’ याचा काय विचार करते हे फार महत्वाचे आहे. लग्न झालेले असतानाही ती तुमच्यासोबत नाते ठेवायला तयार आहे का ? याचाही विचार करायला हवा. प्रेम ही एक सुंदर भावना आहे आणि या भावनेचा आदर करायला हवा. प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण, ओढ, की प्रणय हे समजून घेणे महत्वाचे आहे. तुमच्या भावना आणि कृती काय आहेत हेही समजून घेणे गरजेचे आहे. मात्र, कोणत्याही प्रेम संबंधांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचा स्वीकार महत्त्वाचा असतो. प्रेमामध्ये दोघांचाही होकार आणि स्वीकार असेल तर पुढे जायला काहीच हरकत नाही. अर्थातच त्याचे जे काही परिणाम होतील त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवूनच. अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करा आणि मगच निर्णय घ्या. ALL THE BEST !!!
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा