प्रश्नोत्तरेमाझे वय 21 हून जास्त आहे पन मला दाङी मिशा येत नाही कृपया मला योग्य सल्ला द्या

2 उत्तर

सगळ्यात महत्वाचं म्हणजे “दाढी-मिशा आल्या तरच तुम्ही पुरुष असू शकता” हा समज तुमच्या डोक्यात असेल तर लगेचच काढून टाका. मिशा न आल्यामुळं तुमच्या लैंगिक आणि एकूणच आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही. प्रत्येकजन वेगळा असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारुयात आणि स्वतःवर खूप प्रेम करुण्यात.

मुलग्यांना चेहऱ्यावर मिशा आणि दाढी किंवा छातीवर आणि एकूणच अंगावर केस असण्यासाठी एक विशिष्ट संप्रेरक कारणीभूत असतं. त्याचं नाव आहे टेस्टेस्टेरॉन. अर्थात या संप्रेरकाच्या अस्तित्वामुळेच पुरुष स्त्रियांपासून वेगळे दिसतात आणि असतात. या आणि अशा इतर काही संप्रेरकांच्या प्रभावमुळेच मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजे मुलग्यांच्या बीजकोशात पुरुष बीज आणि वीर्य कोशात वीर्य निर्मितीसोबतच तोंडावर, छातीवर आणि जांघांमध्ये केस येणे, आवाजातील बदल, स्नायूंचा विकास इत्यादी सर्व बदल ह्या संप्रेरकांच्या प्रभावातूनच होतात.

यानंतरही तुम्हाला असं वाटतं असेल की मिशा यायलाच हव्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उचित. ते तुम्हाला योय मार्गदर्शन करतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 17 =