प्रश्नोत्तरेCategory: Private Questionमाझे वय 60 आहे मला रोज करावेसे वाटते पण माझी बायको या गोश्टीला तयार होत नाही ती म्हणते की या वयात असे करायचे नसते तिला कसे पटउ

1 उत्तर

वयाच्या ६० व्या वर्षी देखील सेक्स करावासा वाटणं, लैंगिक इच्छा होणं यात काहीच गैर नाही पण जोडीदाराचा इच्छा आहे की नाही याचा विचार करणं पण तितकंच गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये वयाच्या ठराविक काळानंतर मासिक पाळी बंद होते यालाच ‘मेनोपॉज’ म्हणतात. शरीरातील काही बदलांमुळे लैंगिक संबंधाची इच्छा आणि ओढ या कालखंडात कमी होते. या वयामध्ये स्त्रीच्या योनीमध्ये कोरडेपणा आणि सैलपणा जाणवतो. या कोरडेपणामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होऊ शकतात. त्यासाठी मेडिकल मध्ये के-वाय जेली नावाचे मलम मिळते जे वंगणाप्रमाणे काम करते. ज्यामुळे लैंगिक संबंध सुखकारक होण्यास मदत होते. पण यासाठी तुमच्या जोडीदाराची इच्छा असणं मात्र महत्वाचं आहे.

ही वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची आणि योग्य संवादाची. कारण सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर मुलं मोठी झालेली असतात, नातवंडे आलेली असतात अशा अनेक गोष्टींचा प्रभावही असू शकतो त्यामुळे लैंगिक संबंध ठेवणे लाजिरवाणे वाटते. कधीकधी इच्छा असली तरी व्यक्त केली जात नाही. पण मूळ मुद्दा आहे तो दोघांनी एकमेकांशी बोलण्याचा. यासाठी तुम्ही स्पेस तयार करु शकता. नव्याने त्यांच्या आवडीनिवडी समजून घ्या. लैंगिक सुख किंवा आनंद केवळ लैंगिक संबंध (शिश्नाचा योनीमध्ये प्रवेश) इतकेच मर्यादित नसून यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. जसे की, शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय, चुंबन अशा क्रियांचा समावेश असतो. एकमेकांना कुरुवाळून, स्पर्श करून शारीरिक जवळीकता वाढवता येईल. हस्तमैथुन हा देखील लैंगिक आनंद मिळविण्याचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे तोदेखील तुम्ही अवलंबू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =