प्रश्नोत्तरेमाझे स्थन मोटे होत आहे पण मी पुरुष आहे उपाय सागा

1 उत्तर

हार्मोन्सच्या बदलामुळे शरीरामध्ये अशा प्रकारचे बदल होत असताना जाणवतात. जसे की  आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत जी विशिष्ठ संप्रेरके निर्माण करत असतात. ही संप्रेरके नलीकाद्वारे किंव्हा रक्तातून शरीरात इतर अवयवांना पोहचवली जातात. ही  विविध अवयवांच्या कार्याचं नियंत्रण करतात. या  संप्रेरकांची योग्य प्रमाणात निर्मिती झाली नाही किंव्हा गरजेपेक्षा जास्त झाली तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. पुरुषामध्ये अँड्रोजेन संप्रेरकांमुळे पुरुषांच्या अंगावर केस येणं, आवाज बसणं, पुरूषबीज निर्मिती होत असते. या संप्रेरकांमुळे शरीराला पुरुषी ढाचा येतो. काही कारणामुळे जर संप्रेरक निर्मितीत घट झाली तर लैंगिक इच्छा कमी होणे, अंगावरचे केस कमी होणे आणि स्तनाची वाढ होणे अशा प्रकारचे बदल जाणवतात. जर याचे रक्तात खूप प्रमाण कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ओेषधांवाटे ते शरीराला पुरविता येते. काही आजारपणातील ओेषधांमुळेही असे बदल जाणवतात. त्यासाठी तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यावर उपचार करावेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 9 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी