प्रश्नोत्तरेमाझ्या अंगावर गालावर हनुवटी हात पाय पाठ सगळीकडे खूप काळे काळे केस आहेत.एवढे केस येण्याचं काय कारण असेल. मला खूप लाज वाटते सगळे अंग मला कपड्याने झाकून ठेवावे लागते.केस काढले तर त्यांची वाढ जास्त होते असे मैत्रिणी म्हणतात म्हणून मी केस काढत नाही. मला उपाय स

2 उत्तर

आपल्या शरीरात काही ग्रंथी आहेत ज्या विशिष्ट संप्रेरकं निर्माण करतात. ही संप्रेरकं अँड्रोजन आणि इस्ट्रोजन अशा दोन गटातील असतात. पुरुष आणि स्त्री अशा दोघांच्याही लिगांमध्ये दोन्ही गटातील संप्रेरकं तयार केली जातात. त्यांच्या प्रमाणात फरक असतो. स्त्री शरीरात इस्ट्रोजन तर पुरुषांच्या शरीरात अँड्रोजन जास्त प्रमाणात तयार होतात.

या संप्रेरकांची जर योग्य प्रमाणात निर्मिती झाली किंवा गरजेपेक्षा जास्त झाली, तर त्याचा शरीरावर, प्रजनन कार्यावर आणि लैंगिक इच्छांवर परिणाम होतो. स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात.

अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते.

अंगावर केस असतील व इतर काही त्रास नसेल तर घाबरण्याचं, काळजी करण्याचं कारण नाही. आपण जसे आहोत तसं स्वतःवर प्रेम करायला/ स्वीकारायला हवं. त्यामुळं स्वतःची लाज वाटून घेण्याची कारण नाही. पण तरीही तुम्हाला केस घालवायचे असतील तर आणि वर नमूद केल्यापैकी इतरही काही त्रास जाणवत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 6 =