प्रश्नोत्तरेमाझ्या प्रियसीला सेक्स ची खुप भिती वाटते काय कराव?

2 उत्तर

अनेकदा ‘सेक्स म्हणजे वेदना’ असे समीकरण बऱ्याच मुलींच्या डोक्यात फिक्स झालेले असते. इतरांचे ऐकलेले वेदनादायी अनुभव आणि एकूणच समाजाची सेक्सकडे बघण्याची दृष्टी याला कारणीभूत असावी. अनेकदा मुलींना सेक्स केल्याने आपण प्रेग्नंट तर राहणार नाही ना ? याची देखील भीती असते. याशिवाय आपल्या समाजामध्ये योनिशुचीतेला खूप महत्व दिले गेल्याने त्याचादेखील कळत नकळत दबाव मुलींवर असतो. शिवाय आपली फसवणूक तर होणार नाही ना ? अशी देखील भीती काहीजणींच्या मनात असू शकते.

भीती आणि गैरसमज घालविण्यासाठी आवश्यक मनमोकळा संवाद आणि लैंगिक ज्ञान. योग्य ती शास्त्रीय माहिती मिळाली की शंका, गैरसमज दूर होतील आणि पर्यायाने भीतीदेखील कमी होईल.

मित्रा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, तिला भीती वाटत असेल, सेक्सची इच्छा नसेल तर तिला तिचा वेळ द्यायला हवा. घाई नको आणि प्रेमाच्या नावाखाली जबरदस्ती तर आजिबातच नको… सेक्समध्ये दोघांची इच्छा, संमती, आदर आणि सुरक्षितता महत्वाची…

Wish you all the very best… Take Care

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 14 =