प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमित्र मैत्रीनींमध्ये बोलताना काही मित्र म्हणाले की दोघांच्या सहमती ने सेक्स रोज किंवा २/३ दिवसाने सतत होत असेल तर स्रि शारीरिक द्रुष्टया दुर्बल असेल तर नेहमी सेक्स केला तर स्त्री ची शारीरिक द्रुष्टया तब्येत सुधरते …हा गैरसमज आहे कि सत्य आहे

1 उत्तर

बघा, पोषक आहार, नियमित व्यायाम, तणावरहित जीवन शैली हे चंगल्या तब्येतीसाठी आवश्यक घटक आहेत. त्या प्रमाणेच लैंगिक आरोग्य, समाधानी लैंगिक जीवन हे सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक घटक आहेत. मात्र लैंगिक आरोग्य आणि समाधानी लैंगिक जीवन असण्यासाठी जोडीदारांमध्ये एकमेकांप्रती आदर, सहमती, विश्वास, मोकळेपणा, संवाद असावा लागतो. शारीरिक सम्बन्ध ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये या गोष्टींचा अभाव असेल तर असे संबंध निरोगी असतीलच असे नाही.

आता राहिला तब्येत सुधारण्याचा मुद्दा. तर एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडलेली असेल तर त्याचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. दुर्बल याचा अर्थ काय हेही समजणे आवश्यक आहे. काही आजार आहे का? टेन्शन आहे का? प्रतिकार शक्ती कमी आहे का? हे सर्व पाहूनच त्यावर उपाय करावा लागेल.

निव्वळ लैंगिक संबंधांनी मग ते सहमतीने असतील तरी तब्येत कशी सुधारेल?

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 0 =