प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी पत्नीसोबत सेक्स करतो तेव्हा वीर्य आत पडते पण लिंग बाहेर काढले की ते वीर्य बाहेर काय यते

1 उत्तर

संभोग करताना वीर्यपतनाच्या वेळी लिंग जर योनीमध्ये असेल तर वीर्य योनीमध्ये जाईल. मात्र वीर्य बाहेर येण्याच्या काही शक्यता पाहू या. कदाचित काही वीर्य लिंगाला चिटकून बाहेर येवू शकतं यात काळजी करण्यासारखं काही नाही. किंवा संभोग करताना पुरुष खाली आणि जोडीदार स्त्री वरच्या बाजूला(वूमेन ऑन टॉप पोजिशन) असेल तेव्हा काही वीर्य गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली येवू शकतं. यातही काळजी करण्यासारखं काही नाही. किंवा तुम्ही ज्याला वीर्य म्हणत आहात तो योनी स्त्रावदेखील असू शकेल. तुम्ही गर्भधारण्या होण्याच्या दृष्टीने काळजीमध्ये असाल तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण गर्भधारणा होण्यासाठी वीर्यातील लाखो शुक्राणूंपैकी एकाचीच गरज असते. जर गर्भधारणा होण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर डॉक्टर काही पोजिशन किंवा इतर उपाय सुचवतात.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 20 =