प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी भावनेच्या भरात मूलगी पसंत केली .लग्न पण केल.पण अाता मला वाटतय की माझा निर्णय चूकला.मी काय करु

1 उत्तर

लग्नासाठी तुमच्यावर काही दडपण होत का? किंवा तुम्हाला आता असं का वाटतंय हे तुमच्या प्रश्नातून समजत नाहीये. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याअगोदर किंवा नकारात्मक विचारांमध्ये गुंतत जाण्यापेक्षा शांतपणे पुन्हा एकदा विचार करा. तुम्ही एखादया विशिष्ट स्थितीमध्ये असाल, जोडीदाराकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर तुमचे विचार, भावना या सर्व गोष्टी जोडीदारासमवेत बोला अगदी स्पष्टपणे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निराशा आणणाऱ्या काही गोष्टी घडतंच असतात. परंतू त्यापलीकडेही विचार करता एक पती-पत्नी म्हणून तुम्ही एकमेकांना पूरक आहात का? याबद्दल विचार करा. जोडीदाराबद्दल मनामध्ये सल ठेऊन एकत्र आयुष्य जगत असताना तिच्यावर अन्याय तर होणार नाही ना? म्हणूनच दोघांमध्येही योग्य संवाद ठेवा. व्यक्तीला स्वीकारताना तिच्यातले गुणदोष देखील स्विकारणं आवश्यक असतं. दोघांपैकी कोणा एकावर जरी अन्याय होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोला. कोणतही नातं जुळायला एक क्षण पुरेसा असतो परंतू ते निभावण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लागत असतं. कोणताही निर्णय घेताना दोघांचाही सहभाग असावा… हे मात्र नक्की.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 14 =